9 Apr 2018

उपोषणापूर्वी काँग्रेस नेत्यांचा छोले-भटुरेवर ताव, छायाचित्र व्हायरल

काँग्रेसचे नेते लोकांना राजघाटवर उपोषणासाठी बोलवत आहेत आणि स्वत: एक हॉटेलमध्ये छोले-भटुरे खाण्याची मजा घेत आहेत. चांगल्या पद्धतीने मुर्ख बनवत आहेत, असे हरिश खुराणा यांनी

देशातील दलितांवरील वाढत्या अन्यायाविरोधात दिल्लीतील राजघाटवर काँग्रेसकडून एक दिवसीय उपोषण सुरू आहे. या उपोषणाचे नेतृत्व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी करत आहेत. याचदरम्यान, काँग्रेसचे काही नेते छोले-भटुरेवर ताव मारतानाचे छायाचित्र समोर आल्याने काँग्रेसवर टीका होताना दिसत आहे. सोशल मीडियावर हे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर भाजपाने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. दरम्यान, या छायाचित्रात छोल भटुरेवर आडवा हात मारणारे काँग्रेस नेते अरविंद सिंग लवली यांनी हे छायाचित्र सकाळी आठ पूर्वीचे असल्याचे सांगत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण काँग्रेसचे नेते उपोषणाच्या नावावर मुर्खात काढत असल्याचा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते मदनलाल खुराणा यांचे सुपूत्र हरिश खुराणा यांनी केला आहे.

Source - Loksatta

Follow by Email